सुवर्णमती - 10

  • 6.4k
  • 2.9k

10 शेषनगरीतून गेलेला चंद्रनाग आणि गंगानगरीतून परतलेला चंद्रनाग या दोन भिन्न व्यक्ती होत्या असेच म्हणावे लागेल. सळसळत्या उत्साहाच्या धबधब्याला अचानक बांध लागल्यासारखे झाले. तो फारसे कोणाशी बोलेना. आपल्यातच मग्न राहू लागला. मनोमनी सुवर्णमतीसाठी झुरू लागला. तो महालातून नाहीसा झाल्यावर सूर्यनागाने गुप्त हेर त्याला शोधण्यासाठी पाठवले होते. त्यांनी चंद्रनाग गंगानगरी जाऊन राजकुवारीस भेटला आणि भेट संपताच तडक शेषनगरीस परतला असा वृत्तांत दिला. ही भेट काही पळांचीच होती असेही त्यास कळले. सूर्यनागास चंद्रनागाचे झुरणे पाहवेना. त्याने चंद्रनागाशी बोलण्याचा प्रयत्न केला. अर्थात तोही निष्फळ ठरला कारण, आता परिस्थितीत कोणताही बदल घडू शकत नाही हे चंद्रनागाच्या मनाने पक्के ठरवले होते. किंबहुना सुवर्णमतीने ते