तुझी माझी यारी - 3

  • 11.8k
  • 6.4k

आज परत शनिवार होता ..अंजली शाळेतून येऊन अभ्यास करत बसली होती तेवढ्यात तिला आठवल की अरे उद्या तर ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणजे उद्या फ्रेंडशिप डे आहे.. ह ..उद्या सरु नक्की येणार सरु साठी फ्रेंडशिप बॅंड घेऊन यायला हवं..तिने मम्मी ला आवाज देणून सांगितलं की ती दुकानात जात आहे . मम्मी : अंजली लांब कुठे जात बसू नकोस इथल्याच त्या रफिक भाई च्या दुकानातून घेऊन ये ..आणि लवकर परत ये.. अंजली : हो मम्मी तिथेच जाणार आहे ..आणि लगेच येते. रफिक भाई च जन्नत स्टोअर अंजली च्या घरा पासून जवळ होत काही ही लागलं की अंजली तिथून च आणत असे