वृद्धाश्रमातलं प्रेम - 10 - अंतिम भाग

  • 5.1k
  • 2.1k

भाग – १० महाजन काका आणि सुधाकाकू आता खुलले होते. त्यांनी मस्त आणि आनंदी आयुष्य जगायला सुरुवात केली होती. सुधाकाकू केसांत रोज एक फूल मळायच्या आणि महाजन काका त्यांची स्तुती करायचे. त्या दोघांना असं आनंदात बघून बर्वेकाका, जोशी आदि मंडळींच्या चेहर्‍यावर समाधानाची एक झलक दिसू लागली होती. आयुष्याच्या उतारवयात का होईना त्यांच्या मित्राला त्यांचं प्रेम मिळालं होतं. महाजन काका आता खुलले होते. त्यांच्या वागण्याबोलण्यात एक वेगळाच उत्साह जाणवत होता. सुधाकाकूंचं काही वेगळं नव्हतं. त्यासुद्धा झालं-गेलं ते विसरून छान जगत होत्या. रोज सकाळी नाश्त्याच्या वेळी, जेवताना, सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी, किचनमध्ये मदतीला या ठिकाणी दोघं भेटत असत. त्यांच्यात नेहमी सकारात्मक संवाद व्हायचे.