साद तिच्या दिलची....

  • 7.6k
  • 2.5k

आज ती पहाटे पहाटेच उठली, खूपच अस्वस्थ होती. आज पुन्हा तिला पंकजची आठवण सतावत होती. आज तर तो तिच्या स्वप्नात दिसला होता. काही दिवसांपासून तीच मन खूप अस्वस्थ असायचं तिला पंकजची आठवण खूप त्रास देत होती. त्याला एकदा भेटावं अस खूप वाटत होतं. पण नेहमीप्रमाणे मन आणि बुद्धी एकमेकांशी लढत होत्या. मन - आता त्याच लग्न होणार आहे मग त्याला आपल्याला कधीच नाही भेटता येणार, त्याच्या लग्नाआधी शेवटचं त्याला भेटावं डोळेभरून बघावं, पुन्हा एकदा त्याच्या मिठीत शिरावं, कुणाचाही विचार पर्वा न करता.डोकं - नाही नाही प्रिया हे चुकीचं आहे, तुझं लग्न झालय एक मुलगी आहे तुला आणि अजूनही तुझं मन पंकजकडे