शेवट गुन्हेगारीचा... - (भाग-१)

  • 7.8k
  • 1
  • 3.2k

'अन्नापाडा' मुबई शहराच्या मध्यवर्ती वसलेली एक गजबजलेली मोठ्ठी झोपडपट्टी, परप्रांतीय लोकांसाठी ही वस्ती म्हणजे एक वरदान, इथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येऊन राहत तसेच गुन्हेगारांचा हा अड्डा होता तडीपार केलेले गुन्हेगार, तुरुंगातून पळालेले कैदी, आणि गुन्हे करून पाळालेले गुन्हेगार इथे वास्तव्यास असत,वस्ती दाटीवाटीची, गल्लीबोळाची असल्याने ही जागा लपून राहण्यासाठी या सर्व लोकांना फायद्याची ठरायची, त्यात ह्या झोपडपट्टीवर राजकीय वरदहस्त असल्याने इथे फारसी कायदेशीर कार्यवाही होत नसे. मराठी कुटुंब फारच कमी, मद्रासी, उत्तरप्रदेश या ठिकाणचे कुटुंब जास्त प्रमाणात वास्तव्यास असत. कृष्णा नाडर हा आपली पत्नी रमय्या हिच्या सोबत हैद्राबाद मधून मुंबईला उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवण्यासाठी येतो, एका नातेवाईकांच्या ओळखीने त्यांना अन्नापाड्यात छोटीसी