मित्रांचे अनाथाश्रम - भाग १

  • 22.8k
  • 10.4k

मी समीर, विवेकचा अत्यंत जवळचा मित्र होतो, पण काय ठाऊक कुणास आमच्यातील दरी आता वाढत चालली होती, कारणही काहीसे तसेच होते. एके दिवशी अचानक रात्री नऊच्या सुमारास विवेक चा एक मेसेज आला,"भेटायचं आहे घरी ये,जसा आहे, तसाच ये,गरज आहे खुप तुझी"मी कसलाही विचार न करता त्याच्या घरी गेलो. त्याने एक बॅग घेतली आणि मला घेऊन बाहेर पडला. आम्ही काळोख्या रात्री रस्त्याने चाललो होतो, पण काहीच बोलत नव्हतो. शेवटी तो एक हॉस्पिटल मध्ये शिरला आणि अमर बद्दल चौकशी करू लागला. नाव कुठेतरी ऐकल्यासारख वाटत होत, वार्डबोय ने इशारा केला त्या दिशेने आम्ही गेलो. रूममध्ये गेलो तेव्हा आमच्याच वयाचा कुणीतरी तिथे एक