अकल्पित (भाग १)

  • 12k
  • 4.7k

सकाळी ६ वाजताचा अलार्म वाजला. निशाने तो बंद केला..तिला आज मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा आला होता.. ते थंडीचे दिवस होते..म्हणून ती परत डोक्यावर चादर घेऊन झोपली..पण नंतर तिच्या लक्षात आले की रिमा तीची वाट बघत असेल..म्हणून ती मनात नसताना ही उठून गेली.. बाहेर अजून अंधारच होता.. निशा नेहमीच्या ठिकाणी पोहोचली. तरीही अजून रिमाचा काहीच पत्ता नव्हता. तसेच रीमा चा फोन ही लागत नव्हता. "शीट यार, ही रीमा पण ना..जर यायचे नव्हते तर आधीच सांगायचे ना..मेसेज तरी करायचा होता..किती झोप येत होती आज..अरे यार..जाऊ देत...हिला नंतरच बघते मी" असे ती स्वतःशीच पुटपुटली. खूप वेळ रिमाची वाट बघितल्यानंतर तिने तिचा मॉर्निंग वॉक