सुवर्णमती - 13

  • 5.9k
  • 2.9k

13 दुसरे दिवशी प्रभातीच दोघे सारथ्यासह निघाले. सोबत अर्थातच काही सैनिकही होतेच. काही अंतर उरल्यावर दूताकरवी फौजप्रमुखांच्या भेटीची परवानगी मागावी आणि मग पुढे जावे असे ठरले. प्रवासात दोघे कामापुरतेच बोलले. ठिकाण जवळ आल्यावर दूतास पाठवून परवानगी मिळवली आणि पुढे कूच केले. सुवर्णमती भेटीस येते आहे हे कळल्यावर जेन चा आनंद गगनात मावेना. तिने तिच्या स्वागताची जय्यत तयारी करवून घेतली. मोटरगाडी बंगलीसमोर पोहोचताच सर्व औपचारिकता बाजूला ठेवून जेन धावतच बाहेर आली आणि आपल्या बालमैत्रिणीला घट्ट आलिंगन दिले. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची, सडपातळ बांध्याची गुलाबी गोरी जेन सुवर्णमतीपेक्षा चार बोटे उंचच होती. पण तरीही एखाद्या बाहुलीसारखी नाजूक आणि सुंदर होती. चंद्रनागाची