सुवर्णमती - 14

  • 6.5k
  • 1
  • 2.8k

14 आता काही वेळेस चंद्रनाग आणि जेन दोघेच घोडसवारीस जाऊ लागले. रात्री भोजनानंतर जेन आणि चंद्रनाग नृत्याचे धडे या दोघांना देऊ लागले. प्रथम ते काही पावले नाचून दाखवत आणि मग या दोघांना करावयास सांगत. प्रचंड अवघडलेल्या स्थितीत दोघेही नृत्याचे धडे गिरवू लागले. जेन शेवटी म्हणाली, “कुवंर ती पत्नी आहे तुमची. हक्काने कवेत घेवू शकतां तुम्ही.” चंद्रनाग आणि जेन यावर दिलखुलास हसू लागले. सूर्यनाग आणि सुवर्णमतीने मात्र गोरेमोरे होऊन एकमेकांकडे पाहिले. मग क्षणात त्यांनी नजरा दुसरीकडे वळवल्या. कधीकधी रात्री तिघे मेजवानीविषयी चर्चा करत तेव्हा सूर्यनागही तपशील पाहू लागला, काही वेगळे वाटले तर बदल सुचवू लागला. राज्यासाठी, ही मेजवानी महत्वाची आहे