सुवर्णमती - 16

  • 6.2k
  • 2.9k

16 दुसऱ्या दिवशी चंद्रनाग प्रभातीच लॉर्डला भेटण्यास गेला. प्राथमिक बोलाचालीनंतर, रीतसर, जेनचा हात त्याने मागितला. यावर लॉर्ड कार्टन, प्रथम प्रचंड चकित झाले आणि आणि बघताबघता त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांनी जेनला बोलावणे पाठवले. आणि लगेच निघण्याचा आदेश दिला. चंद्रनागास काही उत्तर देण्याची तसदीही न घेता ते आतील दालनात निघून गेले. सुवर्णमतीस हे कळताच ती सूर्यनागाकडे आली, आणि झालेला सर्व प्रकार तिने कथन करून आपणास ताबडतोब तिथे जायला हवे असे सुचवले. पुढे काहीच न बोलता दोघेही लगबगीने लॉर्ड कार्टनच्या कक्षाजवळ पोहोचली. भेटीसाठी आपण आल्याची वर्दी दिली. लॉर्ड कार्टनने त्यांना आत बोलावले आणि आपण लगेचच जेनसह कूच करीत असल्याचे सांगितले. सूर्यनाग