अकल्पित (अंतिम भाग)

  • 7.7k
  • 3.2k

दुसऱ्या दिवशी सकाळीच रजत आणि निशा भेटले. दोघेही रजतच्या काकांच्या राहत्या घरी पुण्याला गेले. रजतने आधीच काकांना तो आणि निशा घरी भेटायला येण्याची कल्पना दिली होती. निशा काकांचे घरावरचे नाव 'जयराम सरपोतदार' वाचताच भारावून गेली. काकांनी दोघांचे स्वागत केले. औपचारिक ओळख झाल्यानंतर काकांनी दोघांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा निशाने आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत काकांना सांगायला सुरवात केली. हे सगळं ऐकताना काकांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. नंतर रजतने काकांना लोणावळ्याच्या बंगल्यात मिळालेला फोटो दाखवला. काकांचा तो फोटो बघताच चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हे निशाने टिपले. 'काका, तुम्ही ह्या दोघांना ओळखता का? हे कोण आहेत? तुम्हाला याबाबत काही माहीत आहे का?', निशा म्हणाली. यावर