पहाटे उठुन पिहुने पुजा केली...देवापुढे दिवा अगरबत्ती करत सुखी संसाराची प्रार्थना केली... पिहु जा आवरुन ये निघायच आहे.सुधा बोलते... आत्या आई दिसत नाहीये... वहीनी थोड्यावेळापुर्वीच निघाल्या पुजेची तयारी करायची ना,तु ही आवर निघायच आहे आपल्याला... पिहु हो म्हणत रुममध्ये आली ,विराट रुममध्ये नव्हता..ती विचार करत दाराबाहेर बघु लागली....विराट स्टेप्स उतरुन खाली येत होता.. अहो ,ही वेळ आहे का,त्याच्या टीशर्ट ओला होता आत्तापर्यंत तो जिममध्येच होता...म्हणुन ती चिडली. विराट हसतो..किती घाई हहहं ,मुबंईला जायची...जाणारच आहोत...तु उठली़ मग मला पण जाग आली...आता पुजा तर मला करता येत नाही मग म्हटलं जे काम मला येते तेच कराव अस म्हणत तो जवळ जाणारच किती