सुवर्णमती - 17 - अंतिम भाग

(11)
  • 6.3k
  • 2.8k

17 त्या रात्री कुंवर त्यांच्या दालनात न जाता मुख्य कक्षातच बसलेले पाहून तिला जरा आश्चर्य वाटले. आपण इथेच थांबावे की बाहेर जावे, या संभ्रमात ती असतानाच कुंवरने चाहुल लागून वर पाहिले. या वेळेस नेहमीप्रमाणे सुवर्णमतीस पाहून त्याने मान वळवली नाही. उलट तो उठून उभा राहिला. काही क्षण अवघडलेले गेले. हीच योग्य वेळ आहे असे वाटून सुवर्णमती म्हणाली, "कुंवर, आता आपण मला माहेरी परतण्याची अनुमती द्यावी. आपणास हा विवाह इतकाच जर अमान्य होता तर आपण लग्नवेदीवर उभे राहिलातच का? असा प्रश्न मी आपणास विचारणार नाही. आपण राज्यहितास किती महत्व देऊ शकता हे माझ्याइतके इतर कोण समजू शकेल? पण मी आपणाशी