पुनर्भेट भाग २

  • 14.7k
  • 9.5k

पुनर्भेट भाग २ थोड्याच वेळात सुजाता आली .. दोघी कामात गर्क होऊन गेल्या यानंतर सहा कधी वाजले तिला समजलेच नाही . सुजाता आणि ती दोघी दुकान बंद करून बाहेर पडल्या . सुजाता जवळच रहात होती ,रमाचा निरोप घेऊन ती निघून गेली . उद्या रविवार असल्याने आता सोमवारीच दोघी भेटणार होत्या . रविवारी तेथील कॉलेज शाळा बंद असत . शिवाय रविवारी रमाला इतर कोरडे पदार्थ ,त्यांची तयारी ,आणि ते तयार करणे ही कामे असत . मेघना पण रविवारी घरीच असे . त्यामुळे रमा रविवारी दुकान बंदच ठेवत असे . रमा घरी पोचली तेव्हा मेघना काही वाचन करीत बसली होती . आईला