पुनर्भेट भाग ४

  • 15k
  • 8.3k

पुनर्भेट भाग ४ अनाथ आश्रमातच लहानपणापासुन तो वाढला होता . त्याचे शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते . एकदोन प्रयत्नात सरकारी नोकरी पण मिळाली होती . पगार चांगला होता . त्याचे दोन खोल्याचे एक घर सुद्धा होते गावाबाहेर.. थोडे पैसे शिल्लक टाकल्यावर आता त्याला लग्न करायचे होते . त्याच्या बाजुने लग्नाचे पाहायला कोणीच नव्हते. म्हणून त्याने स्वतःच ही स्थळे पाहायची मोहीम सुरु केली होती . आज तो ऑफिसमधील आपला मित्र मोहन याच्यासोबत आला होता . रमाचे स्थळ त्याला असेच समजले होते . त्याने गावातच रमाला पाहिले होते . साधीसुधी पण आकर्षक दिसणारी रमा त्याला आवडली होती . म्हणूनच तिच्या घरच्यांकडे तो