पुनर्भेट भाग ११

  • 12.6k
  • 5.3k

पुनर्भेट भाग १० रमाला मनातून खात्री होती की ऑफिसमधले पैसे घेऊन सतीश ते त्या गुंड लोकांना परत करायला गेला असणार . पण ती माणसे कोठे होती तेही तिला माहित नव्हते . आणि मुळात ही जुगारात पैसे हरल्याची आणि गुंडांच्या धमकीची गोष्ट तर फक्त तिलाच माहित होती. दिवस कठीण झाले होते . असाच आणखी एक महिना गेला . आता एकूण दोन महिने झाले होते तरीही काहीच पत्ता नव्हता . आणि एके दिवशी संध्याकाळी रमा ऑफिसमधून परत येताच घराचे मालक भाडे मागायला दारात आले . भाडे थकीत झाले होते . कसेतरी इकडचे तिकडचे पैसे गोळा करून तिने थकीत पैसे मालकांच्या हातात ठेवले