पुनर्भेट भाग १५

  • 11.4k
  • 1
  • 4.7k

पुनर्भेट भाग १४ रिक्षात बसताच तिने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि मेघनाला फोन करून दुकानातून निघाले आहे असे सांगितले . आता उद्या सकाळी सतीश येऊन दाखल होईल .. कसे कसे करायचे सगळे .? मुख्य प्रश्न मेघनाचा होता तिला काय आणि कसे सांगायचे . त्यात मोहनचा फोन लागत नव्हता . काहीही करून त्याला रात्रीतून इकडे बोलावून घ्यायला हवे परिस्थिती तोच आटोक्यात ठेवू शकेल . घर जवळ येताच रमाने पैसे दिले आणि ती खाली उतरली . काहीतरी कारण काढुन घराबाहेर जाउनच मोहनशी बोलायला फोन करायला लागणार आता असा विचार करते तोच फोन वाजला . फोन मोहनचा होता ..बघताच तिला हायसे वाटले !! “वहिनी