गोरख नाना.

  • 6.1k
  • 2.2k

चोवीस तारखेला माझं गावातलं काम संपलं आणि त्या रात्री मी पंचवीस तारखेला पुण्यात माघारी येण्याचे आराखडे बांधत झोपलो. २५-३-२०. सकाळी सकाळीच कोरोना लॉकडाऊन ची बातमी येऊन ठेपली आणि ती बातमी ऐकून माझ्या काळजात धडकी भरली. तब्बल एक महिना गावालाच राहायचं ! आणि नंतर देवाच्या कृपेने(?) त्या एका महिन्याचं रूपांतर तीन महिन्यांत झालं. मला गावाला राहायला आवडत नाही अशातला भाग नाही पण अगदी लहानपणापासूनच जर तीन-चार दिवसांच्यावर कोण्या पाहुण्याच्या घरी राहायचं म्हणलं की माझ्या जीवावर येतं. हल्ली मी फारसा गावाला जात नाही. याच वेळी तब्बल तीनेक वर्षांनी (टाळता न येण्यासारख्या) कामानिमित्त मी गावाला गेलो होतो. खरंतर तरुणपणात माझं जीवन