एक रहस्य आणखी... - भाग 2

(12)
  • 16.5k
  • 9.5k

भाग 1 वरून पुढे "काय म्हणजे तू नक्की काय पाहिलंय? " रेवती म्हणाली. काल रात्री जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा साधारणतः 2 वाजता अचानक कुणीतरी माझ्या अंगावरून चादर जोरात ओढून फेकून दिली. मी परत अंगावर घेतली तर परत कोणीतरी ती जोरात ओढून फेकून दिली. अचानक पलंगाखालून दोन हात आले आणि माझा गळा दाबायला सुरवात केली. जिवाच्या आकांताने मी ते हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि उठून बसलो. थोडं पाणी प्यावं म्हणून रूममधील बॉटल कडे पहिले तर लक्षात आलं कि बॉटल तर पूर्णपणे रिकामी आहे. रूममध्ये फक्त फॅनचा घर..घर.. आवाज होता. त्याच्या सोबतीला घडाळ्यातील टिक.. टिक आवाजही मला स्पष्ट जाणवत