एक रहस्य आणखी... - भाग 3

(11)
  • 14.9k
  • 2
  • 7.8k

भाग 2 वरून पुढे क्षणातच तिची शुद्ध हरपली आणि ती बेशुद्ध झाली. तिच्या चेहऱ्याला आणि तोंडाला रक्त माखले होते. ती बेशुद्ध जरी असली तरीही तिच्या चेहऱ्यावर असणारी निरागसता केव्हाच मावळली होती. एक भयाण असुरता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. रोहनला काय करावे हे समजतच नव्हते त्याच्या सर्व दुःखाला आणि भावनेला अश्रू वाट मोकळी करून देत होते. लगेचच त्याने अश्रू पुसले आणि मोबाईल वर एक नंबर डायल केला " हॅलो.. बोल रोहन एवढ्या रात्री का फोन केलायस? " " अरे अमित तू आत्ता माझ्या घरी ये यार खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ". " का? चोरी बिरी झाली आहे का? " "