अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 1

(12)
  • 28.5k
  • 1
  • 17k

कॉलेज सुरू होऊन एक महिना सहज होऊन गेला. शौर्यने आजच कॉलेजमध्ये प्रवेश केला शौर्य म्हणजे एकदम रेखीव व्यक्तिमहत्व. उंच, गोरापान आणि त्यावर असणारे त्याच रेखीव असे नाक. पहिल्याच नजरेत कोणालाही पसंत पडेल असा तो. कॉलेजचा आजचा त्याचा पहिला दिवस त्यामुळे एकदम निरखुन तो कॉलेज बघत होता. त्याची नजर वोचमेनला शोधत होती पण तो काही जागेवर नव्हता. "फर्स्ट इयरचा क्लासरूम कुठेय???"उभ्या असलेल्या घोळक्याला त्याने आपल्या मनातील शंका विचारली..कारण त्यांच्या व्यतिरिक्त गेटवर कोणीही दिसत नव्हतं "थर्ड फ्लोर सेकंड लेफ्ट.." त्यातील एकाने त्याला सांगितलं. त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तो क्लासरूममध्ये जायला निघाला. थर्ड फ्लोरवर येऊन बघतो तर लेडीज वोशरूम. तसाच पाठून हसण्याचा आवज येऊ