मुक्ती

  • 7.4k
  • 2.1k

ते उन्हाळ्याचे दिवस होते, आम्ही नुकतेच त्या गावात राहायला गेलो होतो. तसे आम्ही अगदी शहरातले नाही पण खेड्यातही राहण्याचा काही अनुभव न्हवता. त्या गावात नवे जीवन आणि नवीन माणसं भेटली. ते गावं फार मोठे नव्हते, त्याच्या पासून काही अंतरावर तालुक्याचे ठिकाण असल्याने त्या गावात कश्याची कमतरता मात्र मुळीच नव्हती. फक्त कामासाठी किंवा बाजारहाटा साठी थोडं दूर जावं लागायचं एवढा मात्र त्रास होता. प्रवासासाठी दिवसातून तीन वेळा बस वाहतूक होती, तरीही बरीच लोक पायी सुद्धा प्रवास करीत असत. आणि तशाही बैलगाड्याही कशान कशा कामासाठी ये जा करताना दिसायच्या त्यामुळे गाडी चुकलीच तरीही बैलगाडीची सवारी मिळायचीच. आमच्या घरी आई-वडील, एक छोटा भाऊ