श्री सुक्त - 1 - अर्थासह

  • 13.9k
  • 1
  • 5.4k

श्री सुक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत असल्यास.म्हणतांना मनाची एकाग्रता होते.त्याची फलप्राप्ती होते.बऱ्याच जणांना श्री सुक्ताचा अर्थ माहीत असेल पण ज्यांना अर्थ माहीत नाही त्यांच्या करिता रोज एका ऋचाचा अर्थ देत आहे. "श्री सुक्त" हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् | चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१|| अर्थ:-- हे जातवेद म्हणजे विशिष्ट संस्कारांनी आवाहित केलेल्या अग्ने,त्वम-तू,हिरण्यवर्णाम:सोन्याप्रमाणे चमकणारे जिचे रूप आहे,'हरिणीं या शब्दाचा अर्थ चैतन्याच्या आल्हादक प्रभेने सुवर्णाप्रमाणे एक प्रकारचा जिवंत पणा आला आहे"चैतन्याच्या रसरशीत तेजाने बाहेरची सुवर्णकांती जिची द्विगुणित झाली आहे अशा लक्ष्मीला, सुवर्णरजतस्रजाम:-सोने,चांदी यांची स्रक म्हणजे माला