अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 12

(13)
  • 10.1k
  • 5.1k

डिस्ट्रिक्ट लेव्हल मॅचची तैयारी आता जोरदार चालु झाली होती त्याचबरोबर रोहन आणि मनवीची लव्ह स्टोरीही. रोहनच प्रॅक्टिस सोडून संपुर्ण लक्ष मनवीकडे असायचं. कॉलेज सुटल्यावर तिला फिरायला घेऊन जाण, लेट नाईट आऊटिंगला जाण, एकत्र मुव्हीला जाण आणि खुप काही. रोहन आता अनियमित प्रॅक्टिसला येऊ लागला. शौर्य आणि वृषभ ने त्याला समज देऊन देखील मनवीच्या आवडी निवडी जपण्याला तो जास्त महत्व देत असे. रोहनच अनियमित प्रॅक्टिसला येण हे आता स्पोर्ट्सच्या सरांना कुठे तरी खटकु लागलं. नेहमीप्रमाणे रोहन एक दिवशी प्रॅक्टिसला भरपूर उशिरा पोहचला हे जाणत असुन की स्पोर्ट्सच्या सरांना प्रॅक्टिसला असा उशीर झालेला अजिबात आवडत नाही. सरांनी देखील आज त्याला तलवारीच्या टोकावर