(आपण मागच्या भागात पाहिलं की राधिका अजयला टाळायचा प्रयत्न करतेय हे अजयच्या लक्षात आलं होतं. तरीही अजय राधिकाशी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण ती मात्र त्याच्याशी जेवढ्यास तेवढंच बोलत होती. राधिकाचं अजयशी असं वागणं आता अर्चनाच्या पण लक्षात आलं होतं... आता पुढे...) एके दिवशी असेच बसले असताना अर्चनाने अजयला विचारलं. अर्चना- "अजय, राधिकाला काही बोललास का तू ? बर्याच दिवसांपासून पाहते मी, ती तुझ्याशी जास्त बोलत नाही. काय झालंय नक्की सांगशील का मला ?" ?? अजय- "मी काय बोलू तिला सांग...? आणि मी काही बोलण्या अगोदर आधी तिने तर माझ्याशी बोलायला हवं ना... " ?? अर्चना- "अरे पण तू