शेतकरी आंदोलन १८४७ चे !

  • 4k
  • 1.1k

"सर चार्ल्स जॉन कॅनिंग ,गव्हर्नर ऑफ मुंबई प्रोव्हिन्स "--- सोनेरी अक्षरातली ती पाटी डेव्हिडसन ने वाचली आणि शिरस्तेदारला आपण सर कॅनिंगना भेटू इच्छितो म्हणून सांगितले .एक कडक सलाम करून शिरस्तेदार त्या ऑफीस मध्ये शिरला आणि काही सेकांदातच परत आला व डेव्हिडसन ला आदराने आत घेऊन गेला प्रशस्त चकचकीत पॉलीश केलेले सागवानी टेबलं , त्यावर सोनेरी टाक आणि दौत , सिगारची नक्षीदार लाकडी पेटी ,भिंतीवरील मुंबई आणि मडगाव बंदराची सोनेरी फ्रेम मधील भव्य पेंटिंग आणि मागे ब्रिटनच्या किंग एडवर्ड ७वे यांचे भव्य पेंटिंग .,गुबगुबीन गाद्या लावलेल्या प्रशस्त खुर्च्या ,भव्य उंच खिडक्या व त्यांना लावलेले मोहक पडदे ..हे सर्व वैभव पाहून डेव्हिड्सन