प्रेमगंध... (भाग - १७)

(12)
  • 12.3k
  • 6.1k

(आपण मागच्या भागात पाहिलं की... राधिका- "खुप मोठी झालंयस का गं तू आता... आहेस शेंडेफळ पण खुप मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस... आणि तुमच्यामुळे माझं कसलं आलंय गं नुकसान...? काहीही बोलत असतेस... खुप उशीर झालाय... झोप आता गूपचूप, वेडी कुठली..." तशी सोनाली हसू लागली... राधिकाने सोनालीच्या केसांवरून हात फिरवला... आणि सोनाली तिच्या अंगावर पाय टाकून झोपून गेली... राधिकाला पण उशीरा कधीतरी झोप लागली.... आता पुढे...) आज सकाळी राधिकाला जागही लवकरच आली. ती आंघोळ वगैरे आटोपून किचन मध्ये जाऊन टिफीनची तयारी करू लागली. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता... कालचं सगळं आठवून ती एकटीच हसत होती. मेघा आणि मीरा देखील राधिकाला मदत