प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 1

  • 10.7k
  • 1
  • 5.5k

सॅटरडे नाईट आऊट राघवला जास्त काही मानवलेलं नसतं.. दोन्ही हाताने आपलं जड झालेलं डोकं त्यातल्या त्यात दाबुन मेंदूतून जाणवणारे ठणके पुन्हा आतल्या आत कुठे तरी दाबुन ठेवण्याचा त्याचा प्रयत्न चालु असतो.. "गुड मॉर्निंग माय डिअर सन..", नेहमी प्रमाणे वाफाळलेल्या चहाचा कप राघव समोर ठेवत त्याचा डॅड किचनमध्ये जायला निघतो.. "डॅड तु माझ्यावर कधीच का नाही रे रागवत... ",राघव कपातून बाहेर पडणाऱ्या वाफा बघतच आपल्या डॅडला विचारतो.. राघवचे केस विस्कटत जास्त काही न बोलता डॅड सरळ किचनमध्ये निघुन जातो.. "डॅड.. ", राघव पुन्हा त्याला आवाज देत त्याच्या सोबत किचनमध्ये जातो.. "तुझ्या आवडीचा व्हाईट एग आम्लेट बनवतोय.. आवडतं ना तुला?? "हम्मम.. ",