प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 2

  • 7.3k
  • 3.9k

बी स्ट्रॉंग. मेघनाच्या आठवणीने अस्वस्थ असणाऱ्या राघवला त्याच्या डॅडच्या ह्या दोन शब्दांचाच काहीसा आधार होता. ऑफिसमध्ये जायचय ह्या विचाराने राघवच मन आज कुठेच लागत नव्हतं. त्यात आज खुप महिन्यांनी त्याचं मेघनासोबत ऑफिसमधील मिटिंग दरम्यान इंटरेक्शन होणार होतं. आजचा दिवस कसा जाईल ह्याचा विचार करत राघव आरश्यात बघत आपल्या केसांवर हेअरब्रश फिरवत होता. केस विंचरून होताच हेअरब्रश नेहमी प्रमाणे बेडवर फेकत तो ब्रेकफास्ट करायला निघून गेला. “डॅड येतो रे”, डॅडला आवाज देत राघव घाईघाईतच घराबाहेर पडला. डॅडने बाहेर येऊन बघितले तर प्लेटमधला नाश्ता तसाच होता. “हे राघवबेटा. बेस्ट ऑफ लक. बी स्ट्रॉंग. बाय”, बाल्कनीतून नेहमीप्रमाणे राघवला हात दाखवतच त्याचा डॅड म्हणाला.