अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 23

(16)
  • 9.1k
  • 4.2k

सगळेच मज्जा मस्ती करत चौपाटीला आले.. लहान मुलांसारखं एकमेकांच्या अंगावर वाळु उडवन चालु होत.. रात्रीचा थंडावा, समुद्राच्या उधळणाऱ्या लाटांचा आवाज त्यावर ओढलेली चांदण्याने भरलेली आकाशी रुपी चादर... आणि मधुनच ढगांच्या आडून दिसणारा तो चंद्र जणु निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता.. रात्र असल्याने माणसांची वर्दळ देखील कमी होती.. त्यामुळे शांततेने ही तिथे हजेरी लावलेली अस म्हणायला काही गैर नाही.. सगळेच आता ह्या निसर्गच्या सानिध्यात थोडे फार हरवुन गेलेले..राज : "इथुन जावस वाटत नाही यार.. ""हो न..."शौर्य : "गाईज, हॉरर स्टोरी होऊन जाऊदेत... ह्या अंधारभऱ्या शांततेत.."सीमा : "मला चालेल.."राज : "मला पण.."हळुहळु सगळेच आपली संमती दर्शवत होते.. टॉनी : "पण एक अट