सौरभ भयाण वातावरणात रात्रभर रेवतीला शोधत फिरतो. तेवढ्यात सकाळ कधी होते हे त्याच त्याला ही समजत नाही. आणि अशातच बेशुद्ध आवस्थेत असलेली रेवती त्याच्या समोर येऊन पडते तीला त्या अवस्थेत बघून सौरभ खूप घाबरतो तो एकदा आपली नजर इकडे तिकडे फिरवतो पण त्याला कुणीच दिसत नाही.सौरभ रेवतीला उठवायचा खूप प्रयत्न करतो पण रेवती शुद्धीत येत नाही शेवटी कुठे पाणी मिळत का बघावं असा विचार करून रेवतीला तीथेच एका झाडाच्या बाजूला सुरक्षित ठेऊन पाण्याच्या शोधात निघतो.थोडं दूर गेल्यावर त्याला एक विहीर दिसते तो विहिरीतून पाणी काढतो आणि परत रेवती जवळ येतो पण तोपर्यंत रेवतीला शुद्ध आलेली असते.तीला सौरभला बघून आश्चर्य वाटत