मिले सूर मेरा तुम्हारा - 1

  • 12.2k
  • 5.6k

पुण्यातलं एक मोठं कॉलेज. निनाद कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कॉमर्स ला होता. त्याचे ठराविक काही मित्र होते. तो नेहमीच त्या मित्रांमध्ये राहून टवाळक्या करायचा. कॉलेजमध्ये त्याचा दरारा होता. तो त्याच्या गँगचा टीम लिडर होता. हो आता त्याच्या टवाळक्या म्हणजे काही खुप मोठ्या नव्हत्या. आणि विशेष म्हणजे त्याचा कोणाला त्रास होत नव्हता. याला कारणही तसेच होते. निनाद एक हुशार विद्यार्थी होता. त्याचे मित्रही ब-यापैकी हुशार होते. अगदी टॉपर नाही पण सगळ्यांचे मार्क्स चांगले असायचे. शिवाय स्पोर्ट्स मध्ये निनाद आणि टीमचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं. कितीतरी स्पर्धांमध्ये त्यांनी कॉलेजला बक्षिसं मिळवून दिली होती. त्यामुळे प्रिंसिपल आणि बाकी शिक्षक त्यांच्यावर खुश होते. आता वर