मिले सूर मेरा तुम्हारा - 4

  • 8.6k
  • 3.8k

“डॉक्टर काही सीरियस नाही ना?”, निनाद ने विचारले.“आम्ही test केल्यात. त्यांचा bp लो झालेला. आता तो नॉर्मल आहे आणि त्यांचे हिमोग्लोबीन पण खुपंच कमी झालेय. बेशुद्ध आहेत. येतील शुद्धीवर. पण तरी काही तास observation मध्ये ठेवावं लागेल.”,डॉक्टर म्हणाले.डॉक्टर च्या केबिन मधून बाहेर येत निनाद म्हणाला, “ आई आणि निशाला घरी पाठवायला हवं. तू जा त्यांच्यासोबत. मी थांबतो इथे.”“पण मी.. मी कशी जाऊ?”“हे बघ आत्ता आई आणि निशाला तुझी जास्त गरज आहे. मी आहे इकडे. नको काळजी करु. काही वाटलं तर मी फोन करेन.त्यांनी काही खाल्लं नाहीये. तूही खाऊन घे.”“आणि तू ?”“मी खाईन इकडे काहितरी.”वृंदाचं घर तिकडून १० मिनटांवर होतं. तिने