जाई घरी येई पर्यंत एकदम शांत होती. घरी आल्यावर ती सरळ फ्रेश व्हायला गेली. तर नितीन आणि आई बाबा बाहेरच हॉल मध्ये बसून राहिले. सगळेच खूप अस्वस्थ दिसत होते. नितीन आईला म्हणाला,..."आई बाबा तुम्ही दोघेही जाई समोर असे हताश बसू नका, आपल्याला तिला सावरावे लागेल.जरी ती चेहऱ्यावर दाखवत नसली तरी तिची अवस्था माहीत आहे ना कशी असेल." आई पण भरल्या डोळ्यांनी बोलते…."हो रे मला तीच काळजी वाटते. एक तर ती कोणाकडे जास्त बोलत नाही आतल्या आत कुढत राहील. इतकं सगळं झालं तरी तिने डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही." बाबा…."हो ना आपण कमजोर पडलो पण ती कठोर बनली." नितीन..."त्याच कठोर पणाची