मिले सूर मेरा तुम्हारा - 7 - अंतिम

  • 8.9k
  • 3.2k

दिवस असेच छान जात होते. अचानक एक दिवस सकाळी वृंदाच्या खुप पोटात दुखू लागलं. तो शनिवार असल्याने निनाद आणि वृंदा दोघांना सुट्टी होती.“काय झालं वृंदा?”“पोटात दुखतंय रे खुप. चक्कर पण येतेय.”“अचानक कसं? दवाखान्यात जायचं का?”“अचानक नाही रे. पीरियड्स आलेत माझे. म्हणून दुखतंय. खुप वाटलं तर जावं लागेल दवाखान्यात.”“बरं. तू आराम कर. झोप इकडे.”, निनाद ने तिला बेड वर झोपवले आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आला. “जास्तंच त्रास होतोय का?”वृंदा आता रडू लागली होती. तिने निनादचा हात घट्ट पकडला. “काय करु मी? बोल ना कुठे दुखतंय?”वृंदाने पाया कडे इशारा केला. निनादने बाम घेतला आणि तिच्या पायाला चोळला. तिचे पाय तो दाबू लागला तसं तिला