मी

(13)
  • 7.6k
  • 3
  • 2.8k

गेले कित्येक दिवस मन बैचैन होते. कशातच लक्ष लागत नव्हते, खूपच चिडचिड होत होती. माझा हा अवतार बघून मुलंतर सोडाच पण हेपण घाबरले होते. काय झाले म्हणून विचारायचे त्यावर मला स्वतःलाच काय झाले काळात नसल्यामुळे उत्तर देण्याऐवजी अजून चिडत होते. त्यामुळे सगळ्यांनी काय झाले हे विचारणे पण बंद केले होते. वीणकाम, पैंटिंग करून लगेच ताजीतवानी होणारी, ह्यावेळेस सुई किंवा ब्रश हातातच घ्यावासा वाटत नव्हता आणि घेतला तरी काही करायला सुचत नव्हते त्यामुळेतर आणखीनच चिडचिड होत होती. हो! स्वतःबद्दल सारखे प्रश्न मात्र पडत होते. कोण आहे मी? विचार करता करता नक्की मी कोण आहे तेच कळेना. मी कोणाची तरी लेक आहे,