नवरदेवाची फजिती

  • 9.7k
  • 1
  • 3.5k

बबन्याला हळदीला घेवून जायला मुलीकडील दोन पाहुणे आले होते. पाहुणे येवून दोन तास झाले होते,तरी बबन्याचं आवरतच नव्हतं. बबन्याच्या सख्या, चुलत, मावस सगळया बहीणी बबन्याला सजवत होत्या. आज बबन्याला हिरोझाल्यागत वाटत होतं.पाहुणे कंटाळून गेले होते, लवकर चला म्हणून विनवत होते. नवरदेवाकडचे वरचढ बाजू असल्याने त्यांचे ऐकून न ऐकल्यासारखे करत होते. तेवढयात बबन्याचे वडील तिरशिंगराव तेथे आले. त्यांना पाहुण्यांनी नमस्कार घातला. पाहुण्यांना नमस्कार घालून ते बबन्याच्या आईला म्हणाले, “अगं, पाहुण्यांचं जेवणा-खावणाचं काही बघीतलं का नाही?” बबन्याची आई म्हणली, “जेवण-खाणं समदं झालं पाहुण्यांचं”, तेवढयात पाहुणे काकुळतीला येवून तिरशिंगरावांना म्हणाले, “पाहुणं लवकर आवरा, आधीच हिवाळयाचे दिस हाईत,हाळदीला उशीर होईन.” पाहुण्यांचं ऐकून