बळी - ४

  • 14.9k
  • 7.6k

बळी - ४ बराच वेळ झाला, तरीही मिठाईचं एकही दुकान दिसेना. केदारच्या मनावरचा ताण प्रत्येक मिनिटागणिक वाढत होता. शेवटी त्याने चिडून विचारलं, " राजेश! मिठाईचं एक मोठं दुकान दुकान जवळ आहे म्हणाला होतास नं? एवढा वेळ का लागतोय?" "ते दुकान बंद होतं! दुसरं कुठे दिसतंय का-- ते शोधतोय! घाबरू नका! तुम्हाला परत सोडूनच मी जाईन!" राजेशने उत्तर दिलं; पण त्याचा आवाज बदललेला होता. आता त्याच्या स्वरात केदारला जरब जाणवली. "यांनी मला किडनॅप तर केलं नाही---- पण मला पळवून