अभागी ..भाग ९

  • 9.3k
  • 1
  • 4.7k

मधू कॉलेज ला जाते ..सायली आणि अनु ला सांगू का काल मधुर भेटला होता..नको नको हे तर अस होईल की आ बैल मुझे मार..त्या दोघी लगेच चिडवायला चालू होतील..कसल्या मैत्रिणी ..पहावं तेव्हा मला त्रास द्यायला तयार असतात.राहू दे नकोच सांगायला. कॉलेजने ८दिवसाचा कॅम्प आयोजित केला होता..स्वच्छतेच्या प्रसारा साठी ..क्लास नुसार २५-२५ मुलांचा ग्रूप केला जातो व त्यांच्या साठी एक ग्रुप लीडर निवडला जातो..सकाळी १० पर्यंत ..कॉलेजच्या आजू बाजूच्या परिसरातील स्वच्छता करायची .. व ..त्यानंतर प्रत्येकाने कॉलेज हॉल मध्ये जमा राहायचे व तिथे प्रत्येक ग्रुप मधील प्रत्येकानी आपली कला सादर करायची..दर रोज एका नवीन ग्रुप ने कार्यक्रमाची तयारी व नियोजन करायचं..