मधू कॉलेज ला जाते ..सायली आणि अनु ला सांगू का काल मधुर भेटला होता..नको नको हे तर अस होईल की आ बैल मुझे मार..त्या दोघी लगेच चिडवायला चालू होतील..कसल्या मैत्रिणी ..पहावं तेव्हा मला त्रास द्यायला तयार असतात.राहू दे नकोच सांगायला.
कॉलेजने ८दिवसाचा कॅम्प आयोजित केला होता..स्वच्छतेच्या प्रसारा साठी ..क्लास नुसार २५-२५ मुलांचा ग्रूप केला जातो व त्यांच्या साठी एक ग्रुप लीडर निवडला जातो..सकाळी १० पर्यंत ..कॉलेजच्या आजू बाजूच्या परिसरातील स्वच्छता करायची .. व ..त्यानंतर प्रत्येकाने कॉलेज हॉल मध्ये जमा राहायचे व तिथे प्रत्येक ग्रुप मधील प्रत्येकानी आपली कला सादर करायची..दर रोज एका नवीन ग्रुप ने कार्यक्रमाची तयारी व नियोजन करायचं.. व ग्रुप मधील मेंबर्स नी ..काही ना काही तरी सादरी करणं करायचं... स्वच्छ ते बरोबर मनोरंजन ही ..मधू सायली व अनु एकाच ग्रुप मध्ये होत्या..आणि त्यांचा ग्रुप लीडर होता मधुर.
चला उदया पासून कार्यक्रमाला सुरू होणार ..प्रत्येक ग्रुप लीडर आप आपल्या ग्रुपच्या सदस्याला सूचना देत होता..
मधुर ही सर्वांना सूचना देत होता..
मधुर : उद्या सकाळी सर्वांनी बरोबर ७ ला कॉलेज मध्ये हजर राहायचं..आपण कॉलेजच्या उजव्या बाजूला जिथून कॉलनी सुरू होते तिथून सफाई करायची ..त्यामुळे उद्या सर्वांनी तयारीने या..
सर्व जण त्याला ठीक आहे म्हणतात..आणि सकाळी सात ला कॉलेज ला हजर होतात..मधुर त्यांना कॉलनी कडे घेऊन जातो ..तिथे सर्वांना काम सांगून स्वतःही कामाला लागतो ..बरेच जण मधुर दिसला की फक्त काम करत असत व तो थोडा दूर झाला की ..घोळका करून गप्पा मारत बसत..सायली तर जाम चिडली होती.
सायली : काय यार मी तर साध घरी सुद्धा झाडू मारत नाही आणि इथे सगळ्या गावची घान काढायला लावत आहेत..
मधू : तसचं पाहिजे ग तुला ..बिचाऱ्या काकूंना एकटीला काम लावतेस आणि स्वतः मात्र मज्जा करतेस ना ? काढ काढ आता घाण काढ .
अनु : हे भारी आहे ह कॉलेज च ..चांगलं कामाला लावलं आहे इथे आपल्याला..
तो पर्यंत मधुर तिथे येतो ..गप्पा मारून झाल्या असतील तर थोड काम ही करा.
परिसर स्वच्छ राहिला तर माणसाचं आरोग्य ही चांगलं राहील ..आणि आपल्याला कॉलेज ने एक संधी दिली आहे तर तेवढीच थोडी स्वच्छता ही होईल ..
सायली : इतकीच करू वाटते तर तूच कर ना..
मधुर : मी तर करतोच आहे ..आणि मला काही कमीपणा वाटत नाही ..कचरा काढताना..अस म्हणून तो तिथला कचरा गोळा करू लागतो ..मग बाकीचे ही सर्व कामाला लागतात..
सायली मधुर कडे पाहून तोंड वाकड करीत ..पुटपुटत ते मला काही कमी पना वाटत नाही..
मधू : ये सायली गप्प ना यार ..काहीच चुकीचं बोलला नाही तो ..
सायली : हाय राम ..दोस्त दोस्त ना राहा ..मधू तू त्या मधुर ची बाजू घेत आहेस ? तू माझी मैत्रीण आहेस की मधुर ची...?
मधू : सायली यात बाजू घ्यायचं काय ग ?तुला नसेल ना काम करायचं तर मी करते तुझं ही पणं plz ह..आता नौटंकी चालू नको करू.
सायली : बर बाई मी करते..
मधुर त्याचं बोलणं ऐकत असतो ..आणि गालात हसत असतो.
सर्व काम संपवून कॉलेज हॉल मध्ये जमतात ..आता तिथे पहिल्या ग्रुप चा कार्यक्रम सुरू होतो..कोणी कविता ,कोणी गाणी ,कोणी एखाद वाद्य वाजवून दाखवत ..असत.
दोन दिवस छान जातात ..आता मधुरच्या ग्रुप चा नंबर असतो ..तेवढयात विराज पुढे जावून घोषणा करतो की उद्या मधुरा आपल्या सुंदर आवाजात एक कविता ऐकवेल आपल्याला..मधुरा तर शॉक च होते ..मी आणि कविता ?
अनु : हा विराज काही सुधारत नाही यार..
मधुर विराज ला ओरडतो ..तिला जे बोलायचं असेल ती बोलेल ना ..तुझी काय जबरदस्ती रे ?
तसा विराज म्हणतो माझी कुठे सर्वांची मर्जी आहे ..हो ना ? तो सर्वांना विचारतो ..सर्व जण हो..बोलतात..मधुरा मधुरा म्हणून ओरडू लागतात..मधुर चा नाइलाज होतो..
सायली : या विराज चा नंबर येऊ दे बघ याची कशी फजिती च करते ...याला तर डान्स च करायला लावणारं .. जो की याला येतच नाही..
सायली आणि अनु एक मेकीला टाळी देऊन हसतात..पणं बिचारी मधुरा आता उद्या कविता कुठून आणू त्यात ती पुस्तकातील ही नको ..आणि दुसऱ्या कोणाची ही नको..आणि मला तर काही कविता येत नाही.. बट आता ..करायचं काय ?
सायली : ये मधू आपल्या ग्रुप च नाव अजिबात पडू द्यायचं नाही ..अशी कविता म्हण ना ..की विराज च तोंड उघडच राहील पाहिजे ..त्याला कळलं पाहिजे की त्याने सायलीच्या फ्रेन्ड सोबत पंगा घेतला आहे..
मधू : सायली देवी इतकं मोठं मोठे डायलॉग नका मारू ..नाही तर तुम्हीच तोंडावर पडा ल...मला कविता चा क ही येत नाही..
सायली आणि अनु: ते काही आम्हाला सांगू नको ...उद्या तू कविता म्हणायची ..आपल्या ग्रुपच्या ईज्जत का सवाल हैं यार..
मधू : oh god ..बरं बघू मी बघते .
कोणती कविता म्हणेल मधुरा ? की विराज नी विचार केला तसा मधुरा ची फजिती होईल का ? पाहू next part मध्ये...