Abhagi - 1 books and stories free download online pdf in Marathi

अभागी ...भाग 1

कॉलेजच्या मॅगझिन वर स्वतः चा फोटो पाहून मधुरा खूपच शॉक होते ..आणि धावतच टीचर्स स्टाफ रूम कडे जाते ..वाटेतच तिला सायली, अनु, भेटल्या आणि तिला तिथेच अडवून बोलू लागल्या.

सायली: काय ग मधू ? किती खोटारडी यार तू ?

मधुरा : काय खोटं बोलले मी ?

सायली : वा ,वा चोराच्या उलट्या बोंबा याला म्हणतात ..आम्ही किती रिक्वेस्ट केली की मॅगझिन साठी फोटो दे फोटो दे ,तेव्हा तर खूप भाव खाल्ल्यास आणि नाही देणार बोललीस आणि आज चक्क मॅडम चा फोटो मॅगझिन वर ..?

अनु: तू तर छुपे रुस्तम निघालीस की मधू ?

आता मधू ला दोघींचा खूप राग येतो .

मधुरा: shut up हा सायले आणि अनु तू सुद्धा ..मी फोटो दिलाच नाही.

सायली: मग फोटो काय आपोआप गेला का तिथे ?

अनु : तू नाही दिलास तर कोणी दिला मग ?

मधुरा चिडून च बोलते मग

मधुरा: आधी मला तर कळू दे मग सांगते दोघी ना..
अस बोलून ती स्टाफ रूम कडे जावू लागली आम्ही ही येतो म्हणून सायली व अनु ही तिच्या मागे पळतच गेल्या.

कॉलेज मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त फोटो स्पर्धा आयोजित केली गेलेली असते..फक्त मुलींसाठी ..मुलींनी आपले सुंदर फोटो कॉलेज मध्ये जमा करायचे असतात व त्यातून एक फोटो चे सिलेक्ट करून तो कॉलेजच्या या वर्षीच्या मॅगझिन चा कव्हर फोटो होणार असतो .सायली ,अनु व मधूच्या अनेक फ्रेन्ड स नी सांगून ही मधू ने त्या स्पर्धेत भाग घेतलेला नसतो..त्यामुळे आपण फोटो न देता च आपण कसे सिलेक्ट झालो याच कोड तिला पडलेलं असत .
ती स्टाफ रूम मध्ये जाते ..तिला पाहून जोशी सर बोलतात.

जोशी सर : अभिनंदन मधू ..कव्हर गर्ल..

मधुरा: थँक्यु सर पण मला तुम्हाला काही तरी विचारायचं होतं.

जोशी सर : मग विचार na .

मधुरा:सर माझा फोटो कोणी दिला ? म्हणजे मी स्पर्धेत सहभागी झाले नव्हते आणि मी ही फोटो दिला नाही.

सर ही आता विचारात पडतात ..

जोशी सर : या बद्दल मला तर जास्त काही माहिती नाही तू माने मॅडम ना विचार त्याचं होत्या या स्पर्धेचे सारे नियोजन करायला.

मधू आणि सायली , अनु माने मॅडम कडे जातात.

मधू : गूड मॉर्निंग मॅडम

माने मॅडम : अरे मधू ..गूड मॉर्निंग व अभिनंदन कव्हर गर्ल.

मधू: थँक्यु मॅडम ..पणं मी फोटो दिलाच नव्हता तर तुम्ही माझं सेलेक्शन कसं केलं ?

माने मॅडम: पणं तुझा फोटो तर आम्हाला मिळाला होता..कोणी तरी एक लिफाफा आणून दिला होता आणि त्यात तुझा फोटो होता सर्वांना तो आवडला आणि तो सिलेक्ट झाला.

मधू आणि सायली , अनु ही चकित होतात ऐकुन व स्टाफ रूम बाहेर जातात ..

सायली: काय मधू मॅडम ? आता हे कोण नवीन तुमचे आशिक तयार झाले ?

अनु : मग आपली मधू आहेच तशी .. ब्युटीफूल.

मधू : ये गप सायाले ..काय हे आशीक बिशिक लावलं आहेस ? मला नाही आवडत हे असल.

सायली :मग कोण आवडत ? विराज ? कॉलेज हॅण्डसम बॉय?

मधू विराज च नाव ऐकुन थोडीशी हसते पण तसं न दाखवता ती सायली ला बोलते

मधू: कोण तो भाव खाऊ विराज ? सतत पोरींच्या मागे फिरणारा ? हत्त ..नाही आवडत तो मला.

अनु : मग कोण तो मधू वेडा मधुर ?

अनु अस बोलताच मधू अंनुच्या पाठीत एक चापट मारत बोलते.

मधू : ये गप ,त्याचं नाव कशाला काढते .माझी चॉईस इतकी ही खराब नाही समजलं का ? आणि असू दे तुलाच तो मधुर ..मला कशाला जोडतेस त्याच्या सोबत ?

सायली : अग ,होय ग ,पणं आमच्या कडे तो साधा पाहत ही नाही ,नुसता तुझ्या कडेच एक टक लक्ष असत त्याच..आणि आमची ही चॉईस इतकी खराब नाही ..मधुर ला पसंद करायला..आणि तसं तर तुम्ही दोघेच made for each other आहात ग,मधुरा चा वेडा मधुर.
अस बोलून अनु व सायली हसू लागतात. व मधुरा रागावून त्या दोघींना मारू लागते .
सायली : बरं सॉरी बाई ..ये पण बघ ना किती सुंदर फोटो आला आहे ..कव्हर गर्ल चा ..

मधू: तुम्ही दोघी बघा मी जाते घरी.

घरी जावून मधुरा कव्हर फोटो पाहत असते खरंच आपण च आहे का या फोटो मध्ये ? काढणाऱ्या ने किती सुंदर काढला आहे .मग तिला आठवत हा..४ दिवसा पूर्वी आपण कॉलेजच्या बागेत बसलो होतो ..हा फोटो तेव्हाच काढला आहे वाटत..म्हणजे फोटो काढणार आपल्या कॉलेज मधलेच कोणी तरी आहे. ..
झाडा खाली बसलेली मधुरा..वाऱ्याने उडणारे व तिच्या गालावर आलेले केस ..हातात पेन्सिल समोर वही त्यात मग्न असलेली ..किती निरागस आणि सुंदर फोटो होता तो...ती आपल्याच विश्वात दंग असते की तिचा मोबाईल वाजतो.ती मोबाईल मध्ये पहाते तर अनोळखी नंबर वरून तिला एक मॅसेज आलेला असतो ..

अनोळखी:
हाय मधुरा.अभिनंदन कव्हर गर्ल ..तू आहेसच सुंदर मग तुझं सेलिक्शन तर होणारच ना ? पण तुला आवडला का फोटो ? मी काही तरबेज फोटो ग्राफर नाही ग ..मला जमेल तसा काढला..आणि पाठवला स्पर्धा साठी.

मधुरा मॅसेज वाचून लगेच रिप्लाय करते .

मधुरा : कोण आहेस तू ? आणि अस न विचारता मुलीचा फोटो काढतात का ?

अनोळखी : मी तुझा साया ..सदैव तुझ्या सोबत असणारा.

मधुरा : काय साया बिया ? मला नाही कळत असल काही ..नाव सांग ना तू ?

अनोळखी : अग किती चिडते स ..थोड कमी रागवत जा ग..आणि कळे ल ना सर्व वेळ आल्यावर ..

मधुरा त्याला काही विचारणार तेवढयात तिचे मॅसेज जान बंद होत .

कोण असेल मधुरा चा साया? भेटेल का तो मधुराला ? पाहू next part मधेच ..

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED