मधू आणि सायली प्रिनसिपल सरांच्या केबिन कडे जायला वळतात..मग मधूच सायली ला विचारते ..जर सरांनी कालच्या प्रकारा बद्दल विचार ल तर...अग पणं त्यांना कोणी सांगितलं असेल ? अस सायली तिला उलट विचारते..
मधू: मॅडम तुम्ही घाबरला होता पण मी होते ठीक ..बरेच जण जमा झाले होते काल तुमच्या माहिती साठी सांगते..
सायली:अरे हो ग मी थोडी जास्तच घाबरले होते म्हणूनच माझ्या लक्षात आलं नाही..
मधू : बर चल बघू सर काय बोलतात ...ते जे विचारतील त्यावरून ठरवू काय सांगायचं ..पणं मी विराज च नाव सांगणार ..
सायली : अग मधू जावू दे ना ..सर परत का कशासाठी विचारत बसले तर..
मधू :तू बस गप्प ..बघू होईल ते होईल..
दोघी ही केबिन जवळ पोहचतात सराना आत येऊ का म्हणून विचारतात ..सर ही त्यांना आत बोलावतात.. आत येऊन बघतात ..विराज चा सगळा ग्रुप तिथेच असतो..दोघी ही आश्चर्य नी एक मेकी कडे पाहतात..
प्री. सर : काय नाव तुझं ?
अस ते सायली ला विचारतात ..सायली ही घाबरत सायली म्हणून सांगते..
प्रि.सर: आणि तू मधुरा ? मी कॉलेज कव्हर वर पाहिला होता तुझा फोटो.
सायली मधू ला डोळ्यांनीच क्या बात है ..मधू मॅडम के चर्चे तो प्रिनसिपल तक है अस बोलते ..मधू तिला कोपर मारून शांत बस म्हणून सांगते.
मधू : हो सर..
प्रि.सर: कालचा प्रकार कळला मला ..सायली तू ठीक आहेस ना ?
सायली : हो सर ..
प्रि.सर: मग ते विराज च्या ग्रुप कडे वळून रागाने बोलतात..आपल्या कॉलेज मध्ये रॅगिंग चालत नाही हे माहीत आहे ना तुम्हाला ? तुम्ही शिकायला येता इथे की इतरांना त्रास द्यायला येता ? रॅगिंग करणं गुन्हा आहे ..माहित आहे ना ? अशा या घाणेरड्या प्रकरा मुळे मुल कॉलेज ला यायला ही घाबरतात..एखाद्याचा जीव ही जावू शकतो..काल जर सायली ला काही झालं असत तर त्याच जिम्मेदार कोण असत ? विराज ..बोला..थोड्या वेळा च्या मस्ती साठी..एखाद्याच जीवन खराब होवू शकतो..अरे इतकंच काही तुमचं टॅलेंट दाखवायचं असेल तर स्टडी , स्पोर्ट स,गेम्स मध्ये दाखवा..नाही तिथे कशाला दाखवता.?
विराज : सॉरी सर ..चुकलं आमच ..आम्ही फक्त थोडी गम्मत करत होतो ..सायली इतकी घाबरून जाईल अस वाटलं नव्हत ..
प्रि.सर: सॉरी ,मला नको सायली ला बोला ..
विराज व त्याचा ग्रुप सायली कडे पाहून ..
विराज : सॉरी सायली ..आमचा हेतू फक्त थोडी गम्मत करायचा होता..चुकलं आमच ..आम्हा सर्वांना माफ कर..
सायली मनातच म्हणते हो हो विराज नौटंकी .. तुझा हेतू काय होता ते कळलं आम्हाला ..आणि काय भारी अक्टिंग करतोस..आम्ही येण्या आधीच सराना रॅगिंग चा बहाणा दिलास ना पणं बेटा तुझा माहित आहे आम्हाला..
सायली काहीच बोलत नाही म्हणून मधू तिला हलवून जागे करते ..तशी ती आपल्या विचारातून बाहेर येते..
सायली : its ok सर जावू दे ..मी माफ केलं त्यांना..
विराज व ग्रुप : सॉरी सायली परत एकदा आणि थँक्यु .. माफ केल्या बद्दल..
प्रि. सर:तू माफ केलंस पणं यांना असच सोडलं तर बाकीच्यांना ही वाटेल की रॅगिंग केलं तर काही होणार नाही ..ओरडून सोडून देतील..यांना शिक्षा दिलीच पाहिजे..विराज आणि ग्रुप..तुम्ही आज कॉलेज सुटे पर्यंत ग्राउंड ला चक्कर मारायची ..चला पळा लवकर..
विराज : पणं सर सायली ने तर माफ केलं आम्हाला..
आता सर खूपच रागात विराज आणि ग्रुप ला get out from here म्हणून ओरडतात.. तशे सगळे ग्राउंड कडे पळतात ..सायली आणि मधू त्यांची हालत पाहून गालातल्या गालात हसत असतात..ते गेल्यावर ...सर मग त्या दोघींना बोलतात...त्याची जेवढी चुकी तेवढी तुमची ही चुकी आहे ..
सायली आणि मधू एकदम आश्चर्य करून एक मेकिना पाहतात व आम्ही काय केलं सर अस विचारतात..
प्रि.सर: रॅगिंग करणारेच चुकीचे नसतात तर जे घाबरून त्यांनी सांगितलं तस वागतात ते ही चुकीचे असतात..वेळीच धाडस करून त्यांना प्रतिकार करायला हवा ..तरच या रॅगिंग ला आळा बसेल.
सायली मनातच विचार करते ..आता यांना काय सांगावं ते रॅगिंग नव्हत तो तर विराज चा बदला होता..काय रे देवा चूक नसताना यांचा लेक्चर ऐकायला लागला ..ती आपल्याच विचारात आहे हे पाहून ..मग मधुच बोलते.
मधू : हो सर तुमचं बरोबर आहे ..आम्ही नक्कीच आता रॅगिंग होवू देणार नाही..
प्रि.सर: good .. आता तुम्ही तुमच्या क्लास रूम मध्ये जा ..आणि काही प्रोब्लेम आला पुन्हा तर ..नक्की मला सांगा..स्टडी कडे लक्ष द्या आता.
सायली व मधू ..दोघी ही थँक्यु म्हणून निघून जातात.
सायली : यार किती पकाऊ प्रिनसिपल आहे ? बिन कामाचा लेक्चर ऐकावा लागला..
मधू : ये गप्प ग आता त्यांना जे सांगितलं गेलं त्या नुसार ते वागले आणि त्यांनी शिक्षा दिली ना विराज ग्रुप ला आपल्याला तर तेच हव होत ना ?
सायली : हो हो..बघू तर कुठे आहे ..राक्षसी गॅंग...ये ते बघ कसे पळत आहेत ..
मधू ही ते पाहून हसू लागते ....मग दोघी क्लास रूम मध्ये जातात तर आणि वाट पाहत असते ..ते अनु ला केबिन मधलं बोलणं सांगतात ...आणि मग ती ही बर झालं शिक्षा मिळाली म्हणून खुश होते ..
पुढे काय होईल ? पाहू next part मध्ये...