अभागी ...भाग 8 vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अभागी ...भाग 8

कॉलेज सुटत ..सगळी कडे गर्दी होते ..विराज आणि गॅंग ची हलयत तर पळून पळून पाहण्या सारखी झालेली असते ..त्यात गर्दी मध्ये त्याला कोणी तरी धक्का मारत ..त्याच्या मागे असलेला संपत ही विराज सोबत खाली पडतो ..विराज खाली आणि संपत त्याच्या वर ..ते पाहून तर पूर्ण कॉलेज हसू लागत ..विराज खूपच रागात संपत ला ढकलतो व कोणी धक्का दिला म्हणून पाहू लागतो पणं आता तो नाव कोणावर घेणार ? कॉलेज सुटून गर्दी झालेली असते..मग तो तसाच निघून जातो..मधू ,सायली आणि अनु च हसून हसून पोट दुखू लागत... तेवढयात मधू ला मधुर दिसतो ..ती त्याला thanks बोलते तो ही एक smile देवून सायली ला कशी आहेस म्हणून विचारतो..ती ठीक आहे म्हणते ..मधुर तिथून निघून जातो.
सायली आणि अनु ला आता मधू ची थोडी गम्मत करायची लहर येते..

सायली : ये अनु एक चिमटा काढ ग ..मला..

अनु : का ग ?

सायली : मला वाटतं मी स्वप्नात आहे ..आज चक्क मधू वेडे ..दिवाणे नंबर १ मधुर जी माझ्या सोबत बोलले ...

मधू : ये सायली दर वेळी काय ग तुला चेष्टा सुचते ..काल त्यानेच तिला पाणी आणून दिलं होत म्हणून मी बोलले thanks त्याला ..चांगला आहे तो..बिचारा उगाच त्याला चिडवत जावू नका.

सायली आणि अनु : ओह् हो बिचारा ? चांगला ..बापरे आज तर खरंच आपण दोघी स्वप्नात आहोत ग त्या एक मेकिन कडे पाहत बोलतात ..आज मधू मॅडम मधुर ला चांगला म्हणाल्या एरवी तर नेहमी ..त्याला पाण्यात पाहिल्या सारखे करतात...


मधू : चांगल्याला चांगलच बोलावं ..आणि आता तुम्ही तुमची नौटंकी बंद करणार आहात की मार खाणार आहे माझा ?
मग दोघी ही एक मेकि कडे पाहत हसत हसत मधू मागे जातात.

आज घरी गेल्यावर पुन्हा साया चा मॅसेज येतो मधू ला..

साया : हॅलो मधुरा.. कशी वाटली आजची विराज ची फजिती ?पडल्यावर भारी दिसत होता ना तो ?

मधू :म्हणजे त्याला तू पाडलास ?

साया : सॉरी ग मी तसा नाही कोणाला त्रास देन मला अजिबात आवडत नाही ..पणं जेव्हा वेळ तुझ्यावर येते ..मला काय होत माहित नाही.. माझा कंट्रोल राहत नाही ग..तुला जरा सुद्धा काही झालेलं मला बघवणार नाही...


मधू : पणं मला कुठे काय झालं होत ? मी तर ठीक होते ना ?

साया : हो तुला काही झालं नाही ..पणं त्याने प्लॅन तर तुझ्या साठी च केला होता ना त्याची शिक्षा ही त्याला..

मधू : तू कधी येणार आहेस माझ्या समोर ?


साया : येईन ग ..वेळ आली की plz तू चिडू नको..मी तुला कधीच त्रास देणार नाही..मला तर नेहमी तू खूष हवी आहेस ..

मधू विचारात पडते ..कोण हा साया..? इतकी काळजी त्याला आपली ..पणं तो साधं समोर ही येत नाही..उगीच लपंडाव खेळत आहे आपल्या सोबत..म्हणे .. वेळ आली की समजेल ?

आज कॉलेज ला सुट्टी होती..शी यार किती बोर होत घरी..कॉलेज असल की बर असत ..त्या दोन नौटंकी तरी असतात सोबत ..(अनु आणि सायली)..मधू विचार करत असते.तो पर्यंत आई तिला आवाज देते ..मधू आई कडे जाते..

मधू : काय ग ?कशाला बोलावत आहेस ?

आई : जरा मार्केट मध्ये जावून येतेस का ? थोड साहित्य आणायचं आहे ..

मधू : हो ..तू लिस्ट बनवून दे मी आवरून जाते ..


आई : बर ठीक आहे जा तू आवर मी बनवते लिस्ट तोपर्यंत

मधू कपडे बदलून तयार होते आणि आई कडून लिस्ट घेऊन निघत असते ..तिला ही वाटत चला बर झाल ..नाही तर घरात तर वेळच जात नव्हता.
दारातच तिला शेजारच्या काकू भेटतात.

काकू : काय मधू ? बाहेर जायची तयारी चालली आहे ?

मधू : हो काकू मार्केट मध्ये चालले आहे ..आई ने थोड साहित्य आणायला सांगितले आहे.

काकू : अरे वा माझं ही एक काम करशील ?


मधू : हो ..बोला ना काकू तुम्हाला काही आणायचं आहे का ?


काकू : मला नाही ग पणं आमच्या ओम ( काकूंचा एकुलता एक मुलगा ) साठी थोडी गोष्टी ची पुस्तक घेऊन ये..कारटा नुसता बाबांच्या मोबाईल मध्ये गेम खेळत असतो .. घरचा अभ्यास संपला की झालं याच चालू गेम.. गेम..या मोबाईल वरल्या गेम नी तर लहान मुलांना फारच वेड लावलं आहे ..ना बाहेर खेळायला जातो ..ना दुसरं काही..म्हणून म्हटलं ..त्याला थोडी वाचनाची सवय लावावी ..गोष्टी फार आवडतात त्याला..तेवढाच गेम पासून तर थोडा दूर राहील.

मधू : अरे वा काकू ..भारी आयडिया आहे हा तुमची आणि वाचन करणं तर केव्हा ही चांगलाच...मी आणते पुस्तक .


काकू :थांब ह मी पैसे घेऊन येते.

मधू : काकू मी आणते आता आईने दिलेल्या पैशातून तुम्ही परत द्या पैसे..बर कोणती आणू ?

काकू : बर मी आल्यावर देते पैसे..तूच ठरवून आण बाई तुझ्या पसंदी ने ..त्याला आवडतील अशी.

मधू : बर काकू ..आई मी जावून येते.

अस म्हणून मधू मार्केट मध्ये जाते ..आई ने सांगितलेल्या लिस्ट नुसार सर्व साहित्य घेते ..आता राहिली ओम साठी पुस्तक ...थोड पुढे गेल्यावर एक छोटी बुक शॉप दिसते ..ती तिथे पुस्तक विचारते तर तो शॉप वाला इथे जास्त भेटणार नाहीत आम्ही फक्त शालेय पुस्तक ठेवतो ...थोड पुढे जा तिथे एक मोठं शॉप आहे तिथे मिळतील असे सांगतो..मग मधू मी शोधत शोधत शॉप जवळ पोहचते.

शॉप खरंच मोठ असत ..म्हणजेच दोन मजली .. काऊंटर वरच तिला मधुर दिसतो तो मी मधू ला पाहतो.

मधू : हाय ...तू इथे ? शॉप तुमचं आहे की काय ?

मधुर : नाही ग ..माझं शॉप नाही..मी इथे काम करतो .. पार्ट टाईम जॉब ..

मधू : पणं का ? म्हणजे तुझ्या घरची परिस्थिती तर चांगली आहे ना ..मग तुला इथे काम करण्याची गरज कशी काय पडली ?

मधुर : अग घरचं आहे सर्व ठीक पणं असतात माझ्या सारखे ही थोडे..मला माझं शिक्षण माझ्या मेहनती वर पूर्ण करायचं आहे..म्हणजे कमवा आणि शिका ..या योजनेचा माझ्यावर जरा जास्तच प्रभाव आहे अस म्हणू शकतेस ..म्हणून मी इथे काम करतो आणि कॉलेज फीस वगेरे इथे मिळणाऱ्या पगारा तून देतो.

मधू : अरे वा किती छान आहेत तुझे विचार..तुझ्या साठी ती थॉट एकदम राईट आहे बघ .. simple living but High thinking.

मधूर:पणं तू कशी काय इकडे ?

मधू : मी ते गोष्टीची पुस्तके घ्यायला आले आहे.

मधुर : तू गोष्टीची पुस्तके वाचतेस अजून हि?

मधू : अरे माझ्या साठी नाही माझ्या शेजारी एक लहान मुलगा राहतो त्याच्या साठी हवी आहेत .

मधुर : ok इथून पुढे जा लेफ्ट साईड ला एक शेल्फ आहे तो लहान मुलांच्या बुक्स चा आहे..

मग मधू त्याला थँक्यु बोलून शॉप मध्ये जाते .. शॉप मध्ये खूप सारे शेल्फ असतात ...त्यात प्रत्येक साहित्य प्राकरा नुसार पुस्तकांची मांडणी केलेली असते ..कादंबरी , आत्मचरित्र, प्रवास वर्णन ,पाककला अशा विविध विषय ..आणि त्याची तशीच वेगवेगळी मांडणी ..मधू लहान मुलांन साठी असणाऱ्या शेल्फ जवळ पोहचते ..तिथे खूप सारी पुस्तक असतात ..ती शोधू लागते कोणती घ्यावीत बर..तो पर्यंत मधुर येतो...

मधुर : काय झालं अजून भेटली नाहीत का पुस्तक ?

मधू : थोड कन्फ्युज होत आहे कोणती घेऊ सर्वच छान वाटतात.

मधुर : हो इथली सारीच पुस्तक अशी निवडक आहेत ..की कळतच नाही की कोणत घ्यावं आणि कोणत नको ..बर थांब मी हेल्प करतो..तो तुझ्या शेजारचा मुलगा कोणत्या वर्गात शिकतो?

मधू : पाचवीला आहे आता..

मग मधुर पटपट चार पांच पुस्कत काढून तिला देतो ..सुबोध ,चंपक ,संस्काराचे मोती, चांदोबा,मधू ही खुश होते ती पुस्तक पाहून ..शेवटी मधुर अजून एक पुस्तक काढून तिला देतो आणि हे एक घे म्हणतो ..ते असत शिवरायांचं छोटंसं चरित्र..
मग मधू त्याला थँक्यु बोलून पुस्तकाचे पैसे देऊन निघुन जाते ..घरी गेल्यावर काकी ना ती पुस्तक देते काकी तर खूप खुश होते ...छान निवडून आणलीस म्हणून.

मधू आज मधुर चा विचार करत असते ..अरे वा दिसतो किती साधा सरळ पणं किती छान विचार आहेत त्याचे .. खरंच माणसांची ओळख त्यांच्या चेहऱ्यावरून कधीच करू नये.

पुढे काय होईल पाहू next part मध्ये...