Abhagi - 3 books and stories free download online pdf in Marathi

अभागी ...भाग 3

मधुरा कॉलेज मध्ये पोहचताच बागे कडे वळते ....आणि आपल्या आवडत्या जागेवर येऊन पहाते तर खरंच तिथे एक बॉक्स असतो पहिलं तर तिला वाटलं होत ..तो साया खोटं बोलत असेल पणं खरंच बॉक्स आहे हे पाहून तो ती उचलून घेते व ..बागेत आजू बाजूला कोणी दिसत का पहाते ..पणं कोणीच नसतं तिथे ..कोणी ठेवला असेल ? कोण असेल इतक्या लवकर बागेत ..पणं हातात ल्या बॉक्स कडे लक्ष जाताच..तिला तो उघडून पाहण्याचा खूप मोह होतो..आता गिफ्ट म्हटलं की कोणती ही मुलगी खुश होतेच ना..आणि गिफ्ट हातात पडलं की कधी एकदा त्यात काय आहे हे पाहणं म्हणजे जसा मुलींचा जन्मसिध्द हक्क च असतो...मधुराने ही तो बॉक्स उघडला त्यात ब्लू कलर च एक सुंदर स घड्याळ असत....नकळत ..मधुराच्या तोंडातून वॉ व...निघत ..खूप आवडले ल होत ना तिला घड्याळ...सहज तिची नजर स्वतःच्या हातातील घड्याळावर जाते ..परवाच तर तिच्या घड्याळाची कांच ..क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल लागून फुटली होती..आणि ही मुलं क्रिकेट का खेळतात ? मला हेच समजत नाही..मला अजिबात आवडत नाही क्रिकेट अस ती सायली ला म्हणाली होती ..तेव्हा सायली शॉक मध्ये म्हणाली होती...तुला क्रिकेट आवडत नाही..? आणि खूप हसली होती सायली... आज कॉलेज सुटलं की घड्याळ दुरुस्त करायचं तिने ठरवल होत..पणं बॉक्स मधील घड्याळ पाहून या सायाला सगळच कसं कळत ? आता तर खरंच शोध लावायचा त्याचा हे तिने ठरवल होत..तो बॉक्स आणि घड्याळ तिने बॅग मध्ये ठेऊन दिलं होत..घड्याळ जरी तिला आवडल असल तरी एका अनोळखी ने दिलंय ते आणि त्यावर आपला हक्क नाही अस तिच्या मनाने ठरवल होत..ती तशीच कॉलेज मध्ये गेली..सायली आणि अनु ही आल्या होत्या ...लेक्चर्स चालू झाले ...मधू ने सायली व अनु ला लेक्चर संपला की बागेत जावू काही तरी बोलायचं आहे अस म्हणून सांगितलं ..दोघी ही ठीक आहे म्हणाल्या...मधू ला तर कधी एकदाचा लेक्चर संपतो अस झाल होत..एकदाचा लेक्चर संपतो आणि तिघी बागेत झाडाखाली येऊन बसतात..तशी सायली विचारते.

सायली : बोला मधू मॅडम काय बोलायचं आहे ?

मधू काही न बोलता बॅग मधील बॉक्स व घड्याळ काढून दोघीन समोर धरते...

सायली : अरे वा मधू नवीन घड्याळ घेतलीस ? खूप मस्त आहे ग..ये कुठून आणल स ..मी ही घेईन ..असच सेम..

अनु : बघू ना सायली दाखव म्हणून अनु तिच्या हातातून ते घेते ..अरे हो मधू खरंच छान आहे ..तशी मधू ची चॉईस छान च असते ..

मधू : माझं कौतुक करून झालं असेल तर थोड ऐकाल का ?

सायली आणि अनु बोल बोल म्हणतात..

मधू : ते घड्याळ मी नाही घेतलं ..ते साया नी दिलं आहे ..गिफ्ट .

तिचं बोलणं पूर्ण होण्या आधीच सायली मध्येच बोलते ..

सायली : म्हणजे तो तुला भेटला ? कोण आहे ग तो ?

मधू : नाही भेटला नाही ..अस म्हणून मधू तिच्या मोबाईल वरचा मॅसेज दोघींना दाखवते ..

सायली : अस आहे तर..आता तर खरंच त्याचा शोध लावला पाहिजे..

मधू : हो आणि तुम्ही दोघींनी मला मदत करायची..

सायली : अपून तो हमेशा तेरे साथ है बच्चा..अस म्हणून सायली हसते आणि अनु ही ...

मधू : हसून झालं असेल तर कसं शोधायचं हे ही विचार करा.

सायली : अग किती टेन्शन घेतेस मधू ..आपण आहोत ना सोबत बघू ना काही तर विचार करू..पणं तू त्या नंबर वर फोन करून पहीलास का ?

मधू : अग हो मी फोन केले पणं फोन बंद आहे .. ट्रू कॉलौर वर ही चेक केलं पणं तिथे ही काही मिळालं नाही.

सायली : आता तर अवघड आहे..
तिघी ही विचारात असतात की सायली ला एक आयडिया सुचते ..

सायली: ये मधू आपण एक काम करू ज्याच्या ज्याच्या वर शक येतो ना त्यांचे नंबर घेऊ व कोणता जुळतो ते पाहू..

मधू : छान सायली देवी ..इतकंच राहील होत आता ..सगळ्या मुलांचे नंबर मागत फिरते आता मी ..म्हणजे सगळे मला ही मधुरा डोक्यावर पडली की काय म्हणतील ..होय ना ?

सायली : अग तुला नंबर माग कोण बोललं ग ?

मधू : मग?

सायली : आपण कोणत्या तर मुलाची हेल्प घेऊ..

मधू : ये नको ग त्याने आणि हजार प्रश्न विचारले तर काय सांगायचं त्याला?

सायली : आपण अश्या मुलाची हेल्प घेऊ जो आपल्याला काहीच विचारणार नाही..
तेवढयात समोरून मधुर जाताना दिसतो..सायली त्याच्या कडे पाहून विचार करतच होती ..मधुराला तिच्या नज रेने..कळत की ती मधुर चा विचार करतेय ..सायली नको अस म्हणू पर्यंत सायली मधुर ला हाक मारते.

सायली : मधुर...

मधुर तिची हाक ऐकुन दुर्लक्ष करणारच असतो की त्याला मधुरा दिसते आणि तो सायलीच्या दिशेने जातो..

मधुर: मला बोलावलं ?

सायली : हो ..अरे एक काम आहे तुझ्या कडे..माझं..म्हणजे माझं नाही मधुराच आहे ..हो की नाही मधू अस म्हणून ती मधुराला कोपर मारते...मधुराला कळ येते पणं हात चोळत च हो..हो ..इतकंच बोलते.

मधुर : सांग ना मधुरा..काय काम आहे ? मी करेन .

सायली : तुझ्या कडे आपल्या क्लास मधील मुलांचे नंबर आहेत का ?

मधुर : हो बऱ्याच जणांचे आहेत..

सायली : मग दे ना ..

मधुर आपल्या मोबाईल मधील एक एक नंबर सायली ला सांगत असतो सायली ते एका कागदावर लिहून घेत असते..मधुर च लक्ष मात्र सर्व मधुरा कडे असत..मधुरा मात्र त्याची नजर चुकवून दुसरी कडे पाहत असते..आणि अनु मधुर च अस पाहणं बघून गालातल्या गालात हसत असते.
सायली सर्व नंबर लिहून घेते..मधुरा मधुर ला थँक्यु म्हणते ..मधुर निघून जातो..सायली ..साया चा नंबर कागदाच्या सर्वात वरती लिहून घेते व कोणता नंबर मॅच करतो हे चेक करत असते..

कळेल का साया कोण आहे ? पाहू next part मध्ये..

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED