Abhagi - 5 books and stories free download online pdf in Marathi

अभागी ...भाग 5

मधू घरी आली..आज तिने ठरवल होत सायाचा मॅसेज आला की आपण त्याला बोलायचं की आपल्याला त्याला भेटायचं आहे.. हा लपाछपी चा खेळ बंद झाला पाहिजे..आज तिने खूप वाट पाहिली पण आज साया चा मॅसेज आलाच नाही...शेवटी वैतागून ती झोपी जाते .
दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जाते तर आज अनु आलेली नसते..सायली आणि मधू विचार करतात अनु का बर आली नसेल? काल तर बोलली नाही ..की उद्या येणार नाही अस ..बर जावू दे असेल काही तरी काम.

सायली: मधू काय झालं कालच ?

मधू: कशाच ग ?

सायली : अग मी म्हंटले होते ना की साया चा मॅसेज आला तर त्याला बोल म्हणून..

मधू : हो ,बोलणार होते ग ..पणं त्याचा मॅसेज च आला नाही ना..

सायली: बर चल जावू दे ..लेक्चर ला जावू..

दोघी ही क्लास रूम मध्ये गेल्या ..सर्व लेक्चर केले ..नंतर कॉलेज सुटलं....घरी जाण्या आधी ..मधू लाइब्रारी मध्ये जाते..सायली क्लास मधील इतर मुलीनं सोबत बोलत उभी असते म्हणून मधू एकटीच जाते..लायब्ररी मध्ये मधू ला थोडा वेळ होतो ..आणि ती परत जायला वळते तेव्हा ..विराजच्या ग्रूप चा एक मुलगा ..तिच्या कडे पळत येतो ..आणि..

संपत: ये ,मधुरा..ती तुझी मैत्रीण सायली आपल्या क्लास रूम मध्ये बसून खूप रडत आहे ..

मधू : काय ? पणं का ?

संपत: आता ते मला कसं माहित ? तूच जाऊन बघ.

मधू : ok thanks सांगितलं स म्हणून

मधू धावतच क्लास रूम कडे निघाली..आता थोड्या वेळा पूर्वी तर सायली ठीक ठाक होती अचानक काय झालं असेल ? का रडत असेल..म्हणून मधू विचार करतच होती ..की तिच्या मोबाईल वर एक मॅसेज आला..ती दुर्लक्ष करून पुढे जाणार इतक्यात..तिला त्यावरच नाव दिसत ..साया...
तिने तो नंबर साया या नावानेच सेव्ह केला होता..ना .. ती जाता जाताच ..मॅसेज वाचत असते की ती थांबते.

साया : मधुरा,क्लास रूम मध्ये जावू नकोस ..आणि विराज पासून थोड दूर राहा..

मधू तो मॅसेज वाचून तिच्या क्लास रूम मध्ये न जाता क्लास रूमच्या पलीकडे असणाऱ्या पायऱ्यान कडे वळते..आणि तिथे उभी राहून साया ला मॅसेज टाईप करत असते पणं मॅसेज जात च नसतो..बहुतेक नेटवर्क नसेल म्हणून ती मोबाईल इकडे तिकडे वर धरत थोड पुढे जाते..तो पर्यंत तिला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू ..येतो ..मधू त्या आवाजाच्या दिशेने जातच असते ..की ..तिला समोर विराज चा ग्रुप व विराज दिसतो . ते सर्व जण क्लास रूम बाहेर उभे राहून मोठ्याने हसत असतात..ते तर तिला पाहून असे घाबरतात जस भूत पाहिलं असेल..त्यात संपत मोठ्याने बोलतो च ..अरे ही इथ आहे तर क्लास रूम मध्ये कोण आहे ? सगळे तिथून पळून जातात..
मधू क्लास रूम जवळ येते आणि..पहाते तर क्लास रूम ला कडी असते आणि आतून कोणी तरी दरवाजा ठोकत आणि रडत असत..मधू पटकन कडी काढते...तोपर्यंत कॉलेज मध्ये असणारे इतर मुल मुली क्लास रूम कडे येतात... त स..कॉलेज सुटलेलं असत त्यामुळे जास्त कोणी नसतच..मधू कडी उघडून पाहते तर त्यातून सायली बाहेर येते रडतच..मधू शॉक च होते..सायली रडत रडत तिच्या गळ्यात पडते ..मधू भूत ..भूत आहे क्लास मध्ये..

मधू : अग सायली रडू नकोस ..काही झालं नाही ग .. कसल भूत ?

तोपर्यंत बाकीचे क्लास रूम मध्ये जातात व डेस्क खाली असलेला एक टेप उचलून आणतात ..त्यातून भुताचा आवाज ऐकू येत असतो .. व तो टेप बंद करतात..मधू ते पहाते.

सायली अजून हि खूप घाबरलेली असते..
मधू : अग सायली बघ ..काही भूत वगेरे नाही ..बघ कोणी तरी मुद्दाम चेष्टा केली आहे ग तो आवाज या टेप मधून येत आहे ग..अग ..बघ ना ..तुला माझ्यावर तर विश्वास आहे ना?

सायली मान वळवून पहाते तर खरंच टेप असतो ..ती थोडी शांत होते..मधुर ही तिथे आलेला असतो ..मधुरा त्याला बोलते.
मधू: मधुर plz थोडं पाणी आणतो स का ?

मधुर पाणी आणून मधुला देतो ..सायली अजून हि मधू ला सोडत नसते ..मधू तिला पाणी देते ..ते पिल्यावर ती थोडी शांत होते.. मधूला वाटत विचारावं सायली ला की ती क्लास रूम कडे कशाला गेली होती ? पण सायलीची अवस्था पाहून ती काही नको विचारायला म्हणून ती शांत राहते..सर्व जण आप आपसात कुजबुजत असतात ..कोणी केलं असेल अस ? पणं मधू ला मात्र माहित होत हा कारनामा विराज चा आहे ..तिला त्याचा खूप राग आलेला असतो .

मधू : ये सायली शांत हो आता ..तू तर झाशीची राणी आहेस माझी आणि इतकं घाबरते स..
चल सायली घरी जाऊ मी सोडते तुला...म्हणून दोघी घरी जायला निघतात ..मधुर मधू ला विचारतो मी येऊ का सोबत ? पणं मधुरा नको म्हणते व मी घेऊन जाईन म्हणून त्याला जायला सांगते ..मधुरा सायली ला घरी सोडते पणं सायली ने घरी सांगू नकोस काही कॉलेज मधलं म्हणून तिला येताना बजावलं होत ..त्यामुळे ती सायलीच्या आई ला सायली ला थोडी चक्कर आली म्हणून सांगते .. व तिला आराम करायला सांगून घरी येते.

आज मधू ला साया चा मॅसेज येतो.

साया : मधुरा ,कशी आहेस ? तुला तर काही झालं नाही ना ?

मधू : नाही ,मी ठीक आहे पण तू मला का क्लास रूम मध्ये जावू नको बोलला होतास ? आणि तुला कसं माहित सर्व ?

साया: हा सर्व विराज चा प्लॅन होता..तुझ्या साठी होत सर्व ..पणं बीच्यारी सायली फसली त्यात..मी कॉलेज सुटल्यावर विराज ला त्याच्या ग्रुप सोबत बोलताना ऐकलं होतं..ते तुला घाबर वणार होते..

मधू : पणं मला का ? मी काय केलं ?

साया : कारण तू विरजच्या प्रेमात नाही पडलीस ना म्हणून त्याची शिक्षा.

मधू : पणं सायली कशी फसली ..

साया : आता हे तर मला ही माहित नाही तू च विचार उद्या तिला..

मधू : काही पणं असू दे पणं विराज ला शिक्षा मिळायला हवी..सायली ला काही झालं असत तर त्याला कोणाच्या भावना च कळत नाहीत .

साया : हो तसाच आहे तो त्याला मिळायलाच हवी शिक्षा पणं जर आज तुला काही झालं असत ना मी नसत सोडलं त्याला..

मधू : त्याचं जावू दे ..पणं तू का लपंडाव खेळत आहेस ? समोर का येत नाहीस ?

साया : मधू तू समजतेस तसा बाद मी नाही ग ..आणि तुला त्रास द्यायचा माझा हेतू ही नाही..फक्त माझ्यात हिम्मत नाही .

मधू : कसली हिम्मत ?

साया : माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग पणं तुझ्या समोर येऊन ते व्यक्त करण्याची हिम्मत नाही माझ्यात ..भीती वाटते ग ..तुला मी नाही आवड लों तर.. तुझा नकार ..

मधू : मी कसा विश्वास ठेऊ ?

साया : जर मला तुला त्रास द्यायचा असता तर आज मी तुला क्लास रूम मध्ये जाण्या पासून थांबवलं नसत.

अरे हा त्या मॅसेज मुळेच तर मी क्लास रूम मध्ये गेले नाही आणि विराज च्या प्लॅन मध्ये फसले नाही हे मधुच्या लक्षात येत ..

मधू : थँक्यु आज साठी..

होईल का विराज ला शिक्षा ? सायली कशी फसली ? पाहू next part मध्ये ...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED