कोकणातील आठवणी (भाग १)

  • 10.8k
  • 5.1k

कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर येतं ते निसर्गसौंदर्य. ह्या कोकणाला परशुराम भूमी असेही म्हटले जाते.अशा ह्या निसर्गरम्य कोकणात आहे माझ्या मामाचं गाव.तसे आमचं ही घर आहे कोकणात. पण काही वर्षांपूर्वी ते घर पाडल्यामुळे आता फक्त तिथे घराचा चौथरा बाकी आहे. त्याभोवती सगळीकडे नुसती झाडी पसरलेली दिसते. माझ्या पप्पांचा जन्म त्याच घरात झाला. माझी आजी बरीच वर्षे त्या घरात राहत होती. पण नंतर आजोबांनी मुंबईत खोली घेतली आणि मग आजी मुंबईत आली ती कायमची.मग त्यांनतर मामाचं गाव आमचं गाव बनलं. माझी आजी ही माझ्या आईची सख्खी आत्या त्यामुळे तिचं आणि आईचं माहेर एकच. त्यामुळे गावी आल्यावर आम्ही इथेच उतरत असू. पण न