मी आणि माझा मोगरा

  • 8.3k
  • 3
  • 2.2k

"अती तिथे माती" ही म्हण किती बरोबर आहे असे आजकाल वाटायला लागले आहे. लहानपणापासूनच फुलांची भयंकर आवड. पण ह्या फुलांचा इतका भार होईल असे कधी वाटलेच नव्हत. आईने म्हणे मोगऱ्याच्या फुलाचे छोटेसे रोपटे आणून लावले आणि लगेच माझी चाहूल लागली. मी पोटात असताना माझी जितकी काळजी घेत होती तितकीच काळजी त्या रोपट्याची पण घेत होती. हळूहळू ते रोपटे माझ्याबरोबर वाढत होते. ज्या दिवशी माझा जन्म झाला त्यादिवशी त्या रोपट्यावर एक सुंदरशी कळी उमलली. मी जशी जशी मोठी होत गेले त्याबरोबर त्या रोपट्याचे झाडात रूपांतर होऊन अनेक फुलं यायला लागली होती. आई सांगायची तू लहान असताना त्या रोपट्याजवळ नेले की तू