रेशमी नाते - 28

(44)
  • 23.3k
  • 1
  • 15k

पिहु कॉलेजवरुन येऊन क्लासेस साठी रेडी होते...तिची इच्छा तर नव्हती......विराट त्या बाबतीत तिच काहीच ऐकत‌ नव्हता..त्याने पिहुला नविन ड्रायव्हर म्हणुन सांगितलं होते.....पण तो बाडीगार्ड च काम करत होता.....बॉडीगार्ड पिहुला क्लासला सोडुन बाहेर नजर ठेवुनच होता.....विराट ऑफिसमध्ये होता.....मोबाईल ब्लिंक झाल्याने त्याने हातातली फाईल ठेवुन कॉल रीसीव केला.....सर,देवेश मोहीतेची कार मॅडमच्या क्लास बाहेर आहे.......आर्धा तास झाली......किती वेळ आहे क्लास अजुन.....विराट घाईतच लॅपटॉप बंद करुन ब्लेझर घेऊन क्षणात केबिनच्या बाहेर येत बोलला......( विराटला त्याच्या लॉयर कडुन कळाले होते...पिहु स्वतः केस मागे घेईल....तर त्रिशाला सोडवायला देवेशला सोप जाईल.....तो पिहुला भेटण्याचा प्रयत्न करेलच हे विराटला माहितच होते)देवेश ,पिहुचा क्लास सुटण्याची वाट बघत कार मध्ये,बसला होता.....कारच्या