मित्रांचे अनाथाश्रम - भाग १३

  • 8.7k
  • 3.2k

काल रात्रीचं मनात असुन सुद्धा सर्व मित्र काहीच नाही घडलं असा आव आणून काम करत होती.बाकीचे सर्व कामात असल्याने संजयच्या आई ने मला रजनीला घ्यायला घरी पाठवले. तिची आई सांगत होती की, "त्या महाराणी उशीरा उठतात आणि एकटी येणार नाही ती, कुणीतरी पाहिजे बरोबर..."मी संजयच्या घरी गेलो तेव्हा रजनी तयार होती. तिला घेऊन मी आश्रमात आलो. आतापर्यंत अकरा वाजले होते आणि पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती. कार्यक्रमात प्रत्येकाच्या ओळखीचे कुणी ना कुणी होते. माझ्या ओळखीचे जास्त कुणी येणार नाही म्हणुन मी एका खुर्चीवर निवांत बसलो होतो.दोन मुली आल्या तेव्हा त्यांच्याकडे सर्व मुलं धावत गेले आणि त्यांचं स्वागत करत त्यांना माझ्या