आईची आई

  • 5.9k
  • 1.5k

......मदर्स डे #### आईची आई ###.....आईची आई म्हणजे आज्जी कशी होती आता आठवत नाही. आईचा आज्जीवर आणि आज्जीचा आईवर खूप जीव होता एवढं मात्र आठवतंय. आई एकुलती एक. तिला सख्खा भाऊ नाही. सख्खी बहिण नाही. आज्जीचे माहेर तांदळगाव. गावापासून दोन तीन मैलावर. . मी एकदम लहान होतो. त्यावेळी आज्जी खूप थकली होती. अगदी झोपून होती. माचूळी शेजारीच तिला एक बाजलं टाकलं होतं. तिथे दिवसा पण अंधार असायचा. आई थोड्या थोड्या वेळाने आज्जीकडे जात होती. चहा देऊ का? साबुदाण्याची खीर देऊ का? तांदळाची पेज देऊ का? असं सारखं विचारत होती. आज्जीचा फक्त कण्हण्याचा आवाज यायचा. आज्जी कण्हतच म्हणायची "अन्नावरची वासनाच उडालीय बघ. तोंड